Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन!

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना जिल्हाध्यक्षा सौ. वनिता सोनवले, रेखा साळुंखे व इतर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

इस्लामपूर:- रयतेचे राजे व सर्व कुळांचे प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना त्यांचे जयंती निमित्त इस्लामपूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने त्रिवार अभिवादन करण्यात आले.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ जिल्हा अध्यक्षा सौ. वनिता सोनवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वाळवा तालुका अध्यक्षा सौ. लिला संकपाळ, वाळवा तालुका उपाध्यक्षा सौ. रेखा साळुंखे इस्लामपूर शहराध्यक्ष शहनाज जमादार, रूपाली पेटकर इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close