पुरोगामी संघर्ष परिषदेचे चोपडा तहसील समोर आमरण उपोषण सुरू

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने चोपडा तहसील (जि.जळगाव)कार्यालयासमोर आमरण उपोषण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष धर्मादादा भिल, राज्य प्रवक्ता पांडुरंग रणदिवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष अनिलबापू पानपाटील, तालुकाध्यक्ष खुशाल भिल पांडुरंग ऐवळे यांच्या उपस्थितीत सुरू व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
चोपडा:-(जि.जळगाव) पुरोगामी संघर्ष परिषदेचे चोपडा तहसील समोर घरकुल बांधणेसाठी कठोरा गावातील (तालुका चोपडा जि.जळगाव) गावातील गट नंबर दोनची (2)शासकीय जागा मिळावी या प्रमुख मागणीसाठी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष धर्मादादा भिल (सोनवणे) यांचे नेतृत्वाखाली व राज्य उपाध्यक्ष अनिलबापू पानपाटीलआणी राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनामध्ये चोपडा तालुका अध्यक्ष खुशाल धोंडू भिल, हिलाल गुलाब भिल, चावदस देवचंद भिल, रवींद्र जंगल भिल, सखाराम देवचंद भिल, दंगल महादू भिल, ईश्वर जयसिंग भिल, धमोराज बेनीराम परदेशी, शेवयाबाई भिल, भागाबाई भिल, शांताबाई भिल मंगलाबाई भिल शोभाबाई भिल सरुबाई भिल, कमलाबाई भिल, नबाबाई भिल, सावित्रीबाई भिल, रायाबाई भिल, सुलकंदबाई भिल, प्रतिभाबाई भिल इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


