कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे केले मुख्यमंत्र्यांनी कौतुक
83 कि. मी. चे रस्ते एक महिन्यात केले पूर्ण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
कणकवली –मालवण तालुक्यातील अंगानेवाडी येथील भराडि देवीची दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी यात्रा होती.या यात्रे पूर्वी महाराष्ट्र राज्यचे बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब यांनी यात्रे अंगानेवाडी देवस्थान कडे जाणारे जेवढे रस्ते आहेत तेवढे सर्व रस्त्याचे डांबरीकरण यात्रे पूर्वी करणेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कर्तव्यदक्ष अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांचेवर वर दिली होती. यात्रे पूर्वी जवळपास 83 कि.मी लांबीची रस्ते एक महिन्यातच्या आत रात्रंदिवस झटून अजय सर्वगोड यांनी सहकाऱ्यासोबत पूर्ण केले.


सार्वजनिक बांधकाम विभाग नि मालवण तालुक्यात अंगाने वाडी यात्रे च्या दृष्टीने 83 किमी लांबीचे रस्ते पूर्ण केले त्याबद्दल साबा विभाग चे माननीय मुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कौतुक केले
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठ थोपटली अणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोड कौतुक केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , उद्योग मंत्री उदय सामंत , आमदार नितेश राणे , आमदार रवी फाटक,आमदार प्रताप सरनाईक, प्रमोद जठार इतक्या सर्व मोठ्या मान्यवरांनी सुद्धा कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड तोंड भरून कोड कौतुक केले……. माझ्या जीवनात हा सुवर्ण योग माणसातील देव माणूस बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मुळे आला…. मी आदरणीय रविन्द्र चव्हाण साहेब यांचा कायमचा ऋणी आहे….अशी भावना . कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.




