ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास हलगर्जीपणे करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा पुरोगामी संघर्ष परिषदेची निवेदनाद्वारे मागणी
सांगोला तहसीलदार यांना दिले निवेदन

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सांगोला तहसीलदार यांना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे उपस्थितीत निवेदन देताना तालुकाध्यक्ष भीमराव गडहिरे, राज्य उपाध्यक्ष राजू घाटगे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक श्रीकांत कसबे
सांगोला:-पाचेगाव बुद्रुक [तालुका सांगोला] येथील गोविंद सोपान सकट या तरुणास दुकान गाळ्याचे बांधकाम कसलीही नोटीस न देता थांबव म्हणून गावच्या सरपंच व त्यांच्या मुलाने व इतर दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केले प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आरोपीना अटक न करता कायद्यातील पळवाट शोधून व नातेसंबंध आडवे आल्यामुळे सरळ न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्यामुळे सांगोला तहसीलदार यांना पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ तालुकाध्यक्ष भीमराव [अण्णा ] गडहिरे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे उपाध्यक्ष राजू [दादा] घाटगे यांचे प्रमुख उपस्थितीत निवेदन देऊन सदर अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे सीडीआर काढण्याची मागणी केली असून दहा दिवसाच्या आत कारवाई न केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी नंदकुमार सुरवसे ,मच्छिंद्र कांबळे ,बंडू तोरणे ,समाधान सकट, सुमित वाघमारे, सचिन करचे ,लखन कसबे, निलेश तोरणे ,राजाराम सकट ,दीपक सकट, सोपान सकट, सिकंदर सोहनी इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




