सौ. शुभांगी शेळके या75% अपंग महिलेवरील अन्याय सहन करणार नाही–महासचिव मारूतीराव बोभाटे
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 12 नोव्हेंबर रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेचा आक्रोश मोर्चा,त्वरीत न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सातारा उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना सौ शुभांगी शेळके यांना न्याय मिळण्यासाठी निवेदन देताना प्रदेश महासचिव मारुतीराव बोभाटे ,वनिता जाधव व इतर
तजोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सातारा:- एका 75% अपंग महिलेला आधार देण्याऐवजी तिच्या असह्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या मोहन महादेव हारगे व त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील बेहीशोबी संपत्ती जप्त करून सौ. शुभांगी शेळके या महिलेस न्याय न दिल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा टोकाचा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य महासचिव मारुतीराव बोभाटे यांनी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी याना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
यानंतर बोलताना मारुतीराव बोभाटे म्हणाले सदर महिलेच्या बँक खात्याशी, एटीएम कार्ड व चेकबुकचा जीवे मारण्याची धमकी देऊन गैरवापर करून सदर इसमाने टोकाचा अन्याय केला असुन अजूनही काही ठिकाणी सदरच्या महिलेच्या नावे पैसे गोळा करण्याचे काम ही टोळी करत असून मोठा अनर्थ टाळण्यासाठी सदर महिलेला न्याय मिळणं गरजेचं असल्याचे बोभाटे यांनी शेवटी सांगितले आहे.पुढे बोलताना मारुतीराव बोभाटे म्हणाले 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा व तदनंतर दहा दिवसात आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षा वनिता जाधव , ज्योती पंढत, दौलत सय्यद, पूजा देवकुळे, शारदा देवकुळे, वनिता भिसे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



