स्वार्थ न बघता समाजाचे हित हेच चळवळीचे फलित–प.महा.अध्यक्ष-अविनाश कांबळे

अविनाश कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
*बार्शी*:-(उपळाई ठोंगे)-सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजाला दिशा देत असताना प्रबोधन तर ओघानच येते परंतु अन्यायाच्या विरोधात लढा देत असताना मग तो लढा शैक्षणिक अन्याय असो, सामाजिक अन्याय असो, किंवा शासकीय योजनांचा असो या लढ्यामध्ये वैयक्तिक हित न बघता समाजाचे हित बघितले तरच चळवळीचे ते फलित होऊ शकते असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षअविनाश कांबळे यांनी केले ते उपळाई ठोंगे (तालुका बार्शी) येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बार्शी तालुका पुरोगामी संघाचे परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष नेताजी अवघडे, युवक राज्य उपाध्यक्ष अंकुश भोंडे,पश्चिम महाराष्ट्रट सरचिटणीस खंडू कांबळे,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षा संगीता भोंडे,सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड,सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे,पुणे जिल्हाध्यक्षा प्रियांका कांबळे,सोलापूर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी ज्योतीताई अवघडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
अविनाश कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला*


