Uncategorized

प्रजासत्ताक दिनी सोलापूर जिल्ह्यातील अनुकंपाधारक यांचा आत्मदहनाचा इशारा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:-सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषदेमधील मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी अनुकंपा खाली नियुक्ती मिळावी म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत  आहेत परंतु त्यांची नियुक्ती न झाल्याने  महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्याचे  जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष काँ सिद्धाप्पा कलशेट्टी   कामगार नेते जिल्हा सदस्य महादेव आदापुरे ,धनराज कांबळे, शिवाजी पाटील, प्रदीप शिंदे,राम पवार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या  वतीने तहसिलदार  दत्तात्रय  मोहाळे  यांना निवेदन देऊन २० जानेवारी पर्यंत अनुकंपा धारकांना नियुक्ती न दिल्यास 23 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल व तरीही नियुक्ती न मिळाल्यास 26 जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपा धारक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.

यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर  यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यामधील विविध नगर परिषदेमधील कायम कर्मचारी सेवेत असताना मयत झाले आहेत शासनाने या ३५ अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी म्हणून वेळोवेळी आदेश काढलेले होते परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षापासून या अनुकंपाधारकांची सेवेत नियुक्ती अद्याप पर्यंत दिलेली नाही नियुक्ती न झाल्याने अनेक अनुकंपा धारकांची शासनाच्या धोरणानुसार वयाची कमाल मर्यादा संपलेली आहे व काहीची संपत आलेली आहे परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही.  केवळ प्रत्येक वर्षी शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर प्रतीक्षा सूची यादी बनवली जाते परंतु नियुक्ती दिली जात नाही याबाबत २० ऑक्टोबर २०२२ रोजी मा जिल्हाधिकारी साहेब यांना उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन  दिले होते परंतु जिल्हाधिकारी कार्यालय नगर विकास विभागाकडून   लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देऊन आपण आंदोलन करू नये म्हणून लेखी पत्र संघटनेला दिले होते परंतु यावर अद्याप पर्यत  कोणताही निर्णय न झाल्याने नाईलाजाने  संघटनेने सर्व अनुकंपाधारक यांची नियुक्ती होईपर्यंत उपोषण व आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले यावेळी कामगार संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील कामगार नेते  बाबासाहेब पवार राम पवार हरिभाऊ देवकर अविनाश शिंदे खाजाप्पा दादांनवरू,पारशेट्टी दादासाहेब कांबळे, किरगल व सर्व अनुकंपा धारक  उपस्थित होते. आंदोलनाची पुर्व तयारी करण्याच्या दृष्टीने दत्तनगर येथे सीआयटू या मा. आमदार आडम मास्तर यांच्या कार्यालयामध्ये जिल्ह्याची बैठक संपन्न झाली व कोणत्याही परिस्थीत अनुकंपा धारकांची नियुक्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य सी.आय.टू चे सरचिटणीस कॉ अँड एम एच शेख यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close