पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अध्यक्षपदी धर्मा सोनवणे (भिल)

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
*चोपडा*:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण अध्यक्षपदी कठोरा तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील धर्मा शांताराम सोनवणे (भिल) यांची निवड झाली असून पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष अनिल बापू पान पाटील यांनी त्यांना नुकतेच दिले.
यापूर्वी धर्मा सोनवणे (भिल ) यांनी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम समाजाच्या तळागाळात जाऊन समाजाला न्याय देण्याचे काम चांगल्या प्रकारे केल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
निवडीनंतर बोलताना धर्मा सोनवणे (भिल) म्हणाले उत्तर महाराष्ट्रातील समाज अजूनही शासकीय योजनेपासून वंचित असून त्यांना त्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.धर्मा सोनवणे यांच्या निवडीमुळे धर्मा सोनवणे (भिल) यांच्या निवडीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.



