महिलांनी आपले स्थान स्वतःच्या हिमतीवरच निर्माण करावे –राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे

कडेगाव (सांगली) येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने स्काय झोन इन्स्टिट्यूट मुंबईच्या कडेगाव शाखेचे उद्घाटन करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे जल्हारी श्बनाक वृद्धाश्रमाचेे संचालक राजेशजी गडकरी, राजेंद्र भिसे ,सौ अनामिका गडकरी व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक-श्रीकांत कसबे
कडेगाव:- ग्रामीण भागातील महिलांना अनेक शासकीय योजनांची माहिती नसते किंवा त्याचा लाभ कसा घ्यावा याचीही माहिती नसल्यामुळे अनेक खादी ग्रामोद्योगच्या योजना महिलांसाठी उपयोगी असलेल्या त्या फक्त कागदावरच राहून गरजू महिला पर्यंत पोहोचत नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मुंबई येथील स्कायझोन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महिलांसाठी अवरनेस कॅम्प घेऊन महिलांनी बदलत्या जगामध्ये स्वतःचे स्थान स्वतःच निर्माण करावे यासाठी मार्गदर्शन केले जातेत्याचा महिलांनी घरबसल्या उद्योग योजनांचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करणाऱ्या स्काय झोन इन्स्टिट्यूटच्या कडेगाव तालुका कार्यालयाचे उद्घाटन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना प्रा. वायदंडे म्हणाले बचत गट व अनेक विविध योजनांचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक झाली असल्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेही आर्थिक गुंतवणूक करू नये.
यावेळी जल्हारी श्बनाक वृद्धाश्रमाचे संचालक राजेशजी गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्कायझोन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा सौ. अनामिका गडकरी यांनी महिलांना मार्गदर्शन करून अनेक योजनांची माहिती समजावून सांगितली यावेळी प्रतिभा गुरव, भाग्यश्री खवळे ,पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख प्रा. निवांत कवळे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष राजेंद्र भिसे ,कडेगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल भिसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.