पंढरपूर:-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:-राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतळ्यास सौ.ज्योतीताई बागल (मुख्याध्यापिका यशकिर्ती विद्यालय) ,सौ.प्रणिताताई भालके,सौ. प्रियांका डोंगरे-घाडगे,सौ.आशा मोळक यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी किरणराज घाडगे, स्वागत कदम, संदिप मांडवे,रामा गायकवाड,स्वप्निल गायकवाड, अमर बाबर, गोपी वाडदेकर, पुरूषोत्तम देशमुख, शेखर आटकळे,बंडू काका शिंदे, सोपान काका देशमुख, शेखर भोसले, विनोद लटके,संभाजी देवकर,सत्यम धुमाळ, बंटी वाघ, आकाश पवार, शहाजी शिंदे, सचिन कोल्हे,लक्ष्मण ताड,सुरज पावले, तानाजी मोरे,सुरज गंगथडे,इ.मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी किरणराज घाडगे यांनी जिजाऊ स्मारक उभा करण्यासाठी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, नगरपरिषद व प्रशासकानी तात्काळ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला पाहिजे,५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या स्मारकामध्ये जिजाऊंच्या जीवनावरील भिंती शिल्प, भव्य वाचनालय, जिजाऊ ध्यान हॉल, बरच काही यामध्ये असणार आहे,