Uncategorized

आगामी सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार .आ महादेव जानकर.

पंढरीत महादेव जानकर यांचा प.महाराष्ट्र रासप पदाधिकारी मेळाव्यात अनोखा सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर /प्रतिनिधी:-आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी पंढरपुरात रासप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितले
येथील तनपुरे महाराज मठात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार यावेळी करण्यात आला पुढे बोलताना आमदार जानकर म्हणाले की रासपाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती,नगरपालिका,महानगरपालिका, लोकसभा,विधानसभा या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याने आपापल्या मतदारसंघात कामाला लागावे युती संदर्भात बोलताना आमदार जानकर म्हणाले की जो पक्ष आपणाला सन्मानाने जागा देईल त्याबरोबर आपण युतीसंदर्भात विचार करू असे ते म्हणाले.


या कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी वारकरी पगडी,विठ्ठल रखुमाई ची मुर्ती आणि नोटांचा हार घालून मा.महादेवराव जानकर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव कुमार सुशील राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे ,प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते प्रदेश मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर प्रदेश सरचिटणीस आबासाहेब मोटे, प्रदेश सदस्य वैशाली वीरकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष सुनील बंडगर ,युवक अध्यक्ष अजित पाटील ,प.महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते, कालिदास गाढवे यांनी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास सचिन गुरव,प्रकाश खरात,शरद दडस, गोरख वाकडे. ॲड.शरदचंद्र पांढरे ,नवनाथ मदने, माहाळाप्पा खांडेकर, तालुकाध्यक्ष संजय लवटे ,संतोष मासाळ ,दामाजी मेटकरी,अनिल हेगडकर,अशोक ढोणे,श्रीमंत हाके,संजय हाके,आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज देवकते यांनी,तर आभार रणजीत सुळ यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close