पंढरपुर शहर विकासासाठी नवनिर्मिती, स्वच्छ व पारदर्शक कारभारा साठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला निवडून द्या :डॉ प्रणिता भालके
प्रभाग क्रमांक 5,7,8 मधील रॅलीस प्रचंड प्रतिसाद

पंढरपूर शहरांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 7,8,5 या प्रभागामध्ये पदयात्रा करण्यात आली यावेळी डॉ. प्रणिता भालके, संतोष कवडे,सुमित शिंदे वैष्णवी बडवे, नाना कदम, सुंदर बोडके आदी उमेदवार व उपस्थित होते

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- पंढरपूर शहर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू करण्यात आली पदयात्रा स. ९ वा. सुरुवात -छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, नगरपरिषद रोड, गांधी रोड, उत्पात गल्ली, हरिदास वेस, भजनदास चौक, गोविंदपुरा चौक, बारा भाई चौक, घोंगडे गल्ली, नामदेव पायरी, तुकाराम भवनच्या पाठीमागील बाजू, मंजुळ घाट, पांडुरंग भवन. पर्यंत काढण्यात आली
पंढरपुर शहर विकासासाठी नवनिर्मिती, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचा भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन डॉ. प्रणिता भालके यांनी केले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर प्रभाग ८ अ बडवे वैष्णवी वैभव ब कवडे संतोष लक्ष्मण प्रभाग ७ व अ. बोडके सुनंदा औदूबर व कदम नाना चंद्रकोर प्रभाग ५ ब शिंदे सुमिन संभाजी यांच्या सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी नगरसेवकपदाचे उमेदवार,मान्यवर मंडळी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,नागरिक महिला वर्ग उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमदेवार डॉ. प्रणिता भालके यांच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी पंढरपूर शहरातील विविध भागातुन सदर प्रचार फेरी परिसरात काढलेल्या पदयात्रामध्ये तरुण कार्यकर्ते मतदार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.




