Uncategorized

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात  ३२ नवीन ग्राम पंचायत कार्यालयांना मंजूरी-आ आवताडे

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

मंगळवेढा/प्रतिनिधी
तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना योजनेअंतर्गत मतदारसंघात ३२ गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालये मिळाले असून त्यांना आता हक्काचे कार्यालय मिळणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली
शासनाने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत ही कार्यालये मंजूर झाली असून या इमारत बांधकामांमध्ये शासन ग्रीन बिल्डींग संकल्पना अमलात आणणार असून नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुविजन, पाण्याचा व ऊर्जेचा काटकसरीने वापर,पर्जन्य जल पुनर्भरण, आणि जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य व साधनसामुग्रीचा त्यामध्ये वापर करण्यात येणार आहे. कामाच्या निविदा झाल्यापासून एक वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण होईल याचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम खात्याकडे देण्यात आली असून दर तीन महिन्याला या बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल शासन घेणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी,डिकसळ, देगाव,आसबेवाडी,धर्मगाव, ढवळस,उचेठाण,कात्रळ,भालेवाडी, हाजापुर,हिवरगाव, शिवणगी,पौट, सलगर खुर्द,यड्राव,मानेवाडी,पडोळकरवाडी, चिखलगी,शेलेवाडी,खडकी,महमदाबाद(शे),सोड्डी या गावांना प्रत्येकी 20 लाख रुपये तर माचनूर,जालीहाळ,खुपसंगी, पाटखळ,कचरेवाडी,डोंगरगाव,संत दामाजी नगर, संत चोखामेळा नगर,लोणार या गावांना प्रत्येकी 25 लाख व पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर ग्रामपंचायतला 20 लाख रुपये इमारत बांधकाम करण्यासाठी मिळणार आहेत.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close