Uncategorized
महापुरुष अवमान प्रकरणी”पंढरपूर बंद”व निषेध मोर्चा संपन्न!
चंद्रकांत पाटील व आ.राम कदम यांचेवर अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची व राज्यपाल कोशिरींची हकालपट्टीची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विषयी अवमानकारक
शब्द खुद्द राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे उच्च पदस्थ राजकीय नेते मंडळीने काढले असताना त्याचा निषेध म्हणून आम्ही भारतीय लोक या सर्वपक्षीय समितीच्या वतीने आज पंढरपूर बंद व निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते .

पंढरपूर बंद मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळून आला, संपूर्ण शहरातील व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद केले आणि या पंढरपूर बंदच्या आव्हानाला प्रतिसाद संपूर्ण शहरां मधील व्यापारी दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केलेली असताना फक्त मंदिर परिसर महाद्वार या भागातील दुकाने ही चालू होती. असे समजताच या मोर्चातील नेत्यांनी “कॉरिडॉर झालाच पाहिजे” अशी घोषणा करताच मंदिर परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली.

महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली.
प्रबुद्ध परिवाराचे सुनिल वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम.म.उपाध्यक्ष सागर गायकवाड, रिपाई ए कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष सर्वगोड, अमित कसबे, विशाल मांदळे, वंचीत बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजू शिंदे,तालुकाध्यक्ष अंकुश शेंबडे,,जिल्एहा उपाध्यक्ष बिराप्पा मोटे,रवींद्र सर्वगोड, एनडीएमजे चे रोहित एकमल्ली, आम आदमी पार्टीचे एम. पाटील, नागेश पवार, डीएसएस प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, मा.नगरसेवक कृष्णा वाघमारे, आण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अवघडे,तालुकाध्यक्ष संजय अडगळे,शहराध्यक्ष मा.नगरसेवक महेश साठे,डीपीआय जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक अंबादास वायदंडे, शहराध्यक्ष अमित अवघडे,उपाध्यक्ष विशाल तुपसौदर,दलित महासंघ जिल्हा उपाध्यक्ष रमेश कांबळे,कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी,महर्षी वाल्मीकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव , ,संभाजी ब्रिगेडचे प.म.उपाध्यक्ष किरणराज घाडगे,शहराध्यक्ष स्वागत कदम, बाळासाहेब बागल, बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक नागेश यादव, शहराध्यक्ष व डीपीआय कामगार संघटना राज्याध्यक्ष अॅड.किशोर खिलारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश फाटे, सुधीर भोसले, उमेश सासवडकर, संदीप मांडवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील, समीर कोळी, शहराध्यक्ष अॅड राजेश भादुले, महात्मा फुले समता परिषद राज्य उपाध्यक्ष प्रा.जयंत भंडारे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल अभंगराव, भीमशक्ती कला,क्रिडा,सांस्कृतीक मंडळाचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड, मल्हार सेनेचे संतोष बंडगर,रासपचे पंकज देवकते, बहुजन समाज पक्ष जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे, जिल्हा सरचिटणीस रवि सर्वगोड वरिष्ठ कार्यकर्ता एल.एस.सोनकांबळे मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे, शिवसेना (ठाकरे) तालुकाध्यक्ष संजय घोडके, शिवसेना (शिंदे )संदिप शिंदे,मा.नगरसेवक सुजीत सर्वगोड, गोविंद सर्वगोड, मा.नगरसेवक शिवाजी मस्के,अॅड. अखिलेश वेळापूर, अमर शेवडे, उमेश वाघमारे,विनायक मागाडे,पोपट क्षीरसागर, किशोर दंदाडे,राधेश बाधले पाटील, अॅड.बादल यादव, दलित मित्र दुर्योधन यादव, सुधीर धुमाळ,गूरू दोडीया, सुदर्शन मसूरे ,
रिपब्लिकन पक्ष तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, मराठा सेवा संघाचे दिलीप पवार, दिलीप भोसले, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष जयश्री पवार आदीसह विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज,अहिल्यादेवी,भाई राऊत,संत गाडगे महाराज,राजर्षी शाहूमहाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोर्चाची सांगता झाली. येथे निषेध सभा संपन्न झाली.विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
मंत्री चंद्रकांत पाटील आ.राम कदम यांचेवर अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे पत्र पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांना पदाधिकाऱ्यांचे हस्ते देण्यात आले.
शेवटी निषेधाचे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधि मंडलाधिकारी विजय शिवशरण यांना पदाधिकाऱ्यांचे हस्ते देण्यात आले.


