महापुरुषांच्या अवमान प्रकरणी 19 डिसेंबर सोमवारी” पंढरपूर बंद” व “निषेध मोर्चा”
"आम्ही भारतीय लोक" चे बंद चे आवहान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी ,कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आ.प्रसाद लाड, आ.राम कदम यांनी छ.शिवाजी महाराज, म.फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले.याचा निषेध म्हणून पंढरपूरातील विविध संघटना,पक्ष एकत्र येऊन सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी पंढरपूर बंद व निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.”आम्ही भारतीय लोक “या बॅनरखाली हे आंदोलन होणार असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलीस निरीक्षक अरुण फुगे व उपनिरीक्षक केंद्रे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजू शिंदे,तालुकाध्यक्ष अंकुश शेंबडे,डीएसएस प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे,रिपाई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष सर्वगोड, डीपीआय जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे,शहर अध्यक्ष अमित अवघडे उपाध्यक्ष विशाल तुपसौदर,मनसेचे शहराध्यक्ष संतोष कवडे,माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे,एनडीएमजेचे रोहित एकमल्ली, धनाजी शिवपालक, कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूणभाऊ कोळी,वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,,संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शनीमहाराज घुले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील , शहराध्यक्ष अॅड. राजेश भादुले,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदिप मांडवे,,राष्ट्रवादी काँग्रेस युवक राज्य उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे,शिवसेना तालुकाप्रमुख संजय घोडके, म.फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल अभंगराव ,साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय अडगळे शहराध्यक्ष महेश साठे,,बसपाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र कांबळे,प्रबुद्ध परिवाराचे सुनिल वाघमारे, भीमशक्ती कला,क्रीडा कला वव सांस्कृतीक मंडळाचे आधारस्तंभ उमेश सर्वगोड, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप पवार, दिलीप भोसले ,रिपाई ए चे शहराध्यक्ष अॅड.किर्तिपाल सर्वगोड, डीपीआय कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड.किशोर खिलारे,राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव,अ.भा.सफाई कामगार संघटनेचे नेते गुरू दोडीया,यशवंत सेनेचे राजेंद्र बुध्याळ ,रासपचे पंकज देवकते,सामजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर,समाधान वायदंडे,अमर शेवडे,अॅड.बादल यादव अॅड.अखिलेश वेळापूरे,सुदर्शन मसुरे, तानाजी रणदिवे आदी उपस्थित होते.



