Uncategorized

एमआयटी विश्वशांती गुरूकुलच्या विद्यार्थ्यांची सिबीएसइ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सिबिएसई बोर्डाने ६ आणि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी राबवलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एमआयटी विश्वशांती गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सिबिएसई बोर्डाद्वारे सेंट अर्नॉल्ड सेंट्रल स्कूल पुणे, येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यभरातून सिबिएसइ बोर्डाच्या १०० शाळांनी सहभाग घेतला होत.
एमआयटी विश्वशांती गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “इकोफ्रेंडली सॅपलिंग कंटेनर्स” या प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रथम क्रमांक मिळवला. हा प्रकल्प सादर करणारे इयत्ता नववीचे विद्यार्थी सार्थक गवळी आणि नील दोषी यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
शाळेतील विज्ञान शिक्षक माधवी मोटनकर आणि शमशुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रयोग तयार केले होते.

या यशाबद्दल, शाळेच्या व्यवस्थापन, प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close