पुरोगामी संघर्ष परिषदेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी सुरेश (तात्यासाहेब)खंडारे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:-(दि.१७ मे सोमवार) पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या विदर्भाचे अध्यक्षपदी आडुळ बाजार (ता.दर्यापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ तात्यासाहेब खंडारे यांची नियुक्ती केल्याचे पत्र त्यांना दिले. मा तात्यासाहेब खंडारे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंधरा वर्ष ,काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून पाच वर्षे ,अमरावती काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती सेलचे उपाध्यक्ष म्हणून तीन वर्ष तसेच दर्यापूर विधानसभा निरीक्षक म्हणून काँग्रेस कमिटीतून काम केले असून ते राष्ट्रीय दलित लहू सेना व बहुजन विचारमंच या सामाजिक संघटनांचे माध्यमातून समाजाचे अविरत कार्य करत आहेत त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना विदर्भाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.


