जयसिंगपूर नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीस टाळाटाळ
पुरोगामी संघर्ष परिषदेचा निवेदनाद्वारे आरोप

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी प्रफुल्ल वानखंडे यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष मुसाभाई मुल्ला व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
जयसिंगपूर:- जयसिंगपूर नगरपालिकेतील मयत कर्मचारी नामदेव कृष्णा कांबळे यांचे जागी त्यांचा मुलगा परशुराम नामदेव कांबळे यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देतो असे सांगून त्यांची घोर फसवणूक करून त्यांना टाळाटाळ केली जाते सदर प्रकरणी आर्थिक व्यवहार ही झालेला असून माहितीच्या अधिकाराखाली याची सविस्तर माहिती मागितल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कार्यालया कडून टाळाटाळ केली जाते पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला यांनी याबाबतचे निवेदन देऊन पंधरा दिवसाचे आत सदर मागासवर्गीय कर्मचाऱ्यास न्याय न मिळाल्यास जयसिंगपूर नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला असून नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला आहे.
जिल्हाध्यक्ष मुसाभाई मुल्ला यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत चव्हाण, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख दीपक शिंगे, हातकणंगले तालुका अध्यक्ष मोहसिन मुजावर इत्यादी पदाधिकारी होते.