Uncategorized

आव्हे येथे विविध क्षेत्रातील मान्यवर ४०जणांचा पुरस्कार देऊन सन्मान

आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिमाखदार सोहळा संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-आव्हे, ता – पंढरपूर येथे काल शुक्रवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा. माढा विधानसभा मतदार संघाचे  आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० मान्यवराऺचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जि.प. सदस्य मा. रणजीतसिंह ( भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना  रणजितसिंह (भैय्या) शिंदे म्हणाले कि, विकास कामे ही सातत्याने करावी लागत असतात,ती कधी संपत नसतात दादांच्या माध्यमातून २५१५ योजनेतून पूर्ण माढा मतदारसंघांमध्ये ३० कोटी रुपये पाणंद रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला आहे. त्यामध्ये आपल्या गावासाठी १७ लाख रुपये दिलेले होते. आपण मागणी केलेल्या ओपन जिमचा प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव द्यावा, त्यास डीपीसीतून निधी मंजुरी देण्यासाठी काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर यल्लमा देवीच्या कुंडासाठी दादांच्या आमदार फंडातून सभामंडप यावर्षी किंवा पुढील वर्षी मंजूर करून दिला जाईल. तसेच आपण यल्लामा देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये समावेश करून घेऊन त्यामधून प्रस्ताव द्यावा. त्यामुळे आपणास वॉल कंपाउंड व इतर विकास कामासाठी सातत्याने निधी मंजूर करण्यात येतो.


ते बोलताना पुढे म्हणाले की, आज आपण जो हा गुण गौरव सोहळा कार्यक्रम घेतलेला आहे. तो खरच अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. यामध्ये उद्योग, वैद्यकीय, बँकिंग, शिक्षण , सामाजिक, क्रीडा, शेती तसेच इतर क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा आपण सन्मान केला. यामध्ये चिंचणी गावामध्ये मोहनराव अनपट यांचे खुप काम चांगले आहे. तसेच कोरोना काळामध्ये राजभाऊ शिंदे यांनी त्यांच्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून अगदी देवदूतासारखे काम केले आहे. तसेच सर्वच सत्कारमूर्तीनी खरोखरच चांगले काम केलेले आहे.त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.


ते पुढे म्हणाले की, आज येथे उपस्थित वेगवेगळ्या गावचे सरपंच व इतर प्रतिनिधींनी आपल्या गावामध्ये जिल्हा दूध संघाची डेअरी सुरू करावी असे त्यांनी आवाहन केले. जिल्हा दूध संघाचे संकलन १७ हजार वरून आज ते पन्नास हजाराकडे वाटचाल करीत आहे. संघाच्या माध्यमातून आपण दूध उत्पादकांना बोनस देणार आहोत.


यावेळी आनंद (बापू) पाटील, चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय (बाबा) शिंदे, उद्योजक राजाभाऊ शिंदे, चिंचणीचे मोहनराव अनपट, गणेश तूपसमुद्रे, आव्हे गावचे सरपंच रणजीत कांबळे,पोलीस पाटील रामचंद्र कांबळे, रविराज बनसोडे, तानाजी कांबळे, जाधववाडीचे सरपंच हनुमंत शिंदे, खरातवाडीचे सरपंच बापू आयरे, पांढरेवाडीचे सरपंच दगडू कांबळे, लहू (बापू) यमगर, संजय कारंडे, मारुती भुसनर, नाऺदोरेचे सत्यवान कारंडे, मा. सरपंच बिटू (बापू) करवर, देवडेचे संदीप कडलासकर, सागर कडलासकर, करकंबचे अजित देशमुख, नेवरेचे गजानन पाटील, पत्रकार जोतिराम कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक  दत्तात्रय (नाना) बनसोडे, इ. मान्यवर तसेच विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सत्कारमूर्ती व गावातील तरूण युवक, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close