सामाजिक अन्यायाच्या विरोधातील लढयात व्यापकता ठेवून काम करा–संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला [जि.सोलापूर]तालुक्याच्या बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे, राजू घाटगे, भीमराव गडहिरे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगोला:-[जि.सोलापूर] सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना समाजातील गरीब जनतेवर अन्याय करणारा एक सतत घटक सक्रिय असतो याचं भान ठेवून सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढा देत असताना तो लढा निपक्ष:पाती व व्यापक प्रमाणात ठेवून काम केल्यास समाजाला न्याय देणे सोपं होतं परंतु भूतकाळातील झालेल्या चुका सुधारून सामाजिक लढ्याचं स्वरूप असणं गरजेचं असा मोलाचा सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी सांगोला तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या बैठकीत दिला ते सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसमध्ये पार पडलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगोला तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ तालुकाध्यक्ष भीमराव [अण्णा ]गडहिरे यांनी केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजू [दादा]घाटगे प्रमुख उपस्थितीत होते.
सदर बैठकीस नंदकुमार सुरवसे, मच्छिंद्र कांबळे, बंडू तोरणे, समाधान सकट, सुमित वाघमारे, लखन कसबे, निलेश तोरणे, राजाराम सकट,दीपक सकट, सोपान सकट, सिकंदर सोहनी इत्यादी तालुक्यातील पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.