कवठेमहांकाळच्या वाघमारे कुटुंबीयांना न्याय देणार–भीमराव गडहिरे
पुरोगामी संघर्ष परिषदेने घेतली गांभिर्याने दखल

भीमराव उर्फ अण्णा गडहिरे(वरिष्ठ) तालुकाध्यक्ष सांगोला
पुरोगामी संघर्ष परिषद
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगोला- पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगोला तालुका अध्यक्ष (वरिष्ठ) भीमराव उर्फ अण्णा गडहिरे यांचेकडे कवठेमहाकाळ
[तालुका कवठेमहाकाळ जि.सांगली] या ठिकाणी एका सात वर्षाच्या बालकाचा ट्रॅक्टर खाली मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली असून त्या वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्या कुटुंबाला कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही सदर घटना ही संशयास्पद असून तशा प्रकारचा अर्ज लेखी स्वरुपात पुरोगामी संघर्ष परिषदेते सांगोला तालुका अध्यक्ष (वरिष्ठ )भिमराव उर्फ अण्णा गडहिरे यांचेकडे सदर कुटुंबाने केला असून या अर्जाची गांभीर्याने दखल घेतली असल्याची माहिती भीमराव गडहिरे यांनी सांगोला येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली दिली आहे.
गडहिरे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वताने त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असुन जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत पुरोगामी संघर्ष परिषद त्या कुटूंबाच्या पाठीशी ठामपणे राहील असे आश्वासन दिलेले असल्याचे ते पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले.