Uncategorized

टाटा एअरबसचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणा नाहीतर शिंदे-फडवणीस सरकारने आपल्या मंत्रीपदा राजीनामा द्यावा- संदीप मुटकुळे

शिवस्वराज्य युवा संघटनेने केली मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर..:-वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे.हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता.त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं.मात्र,आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीनेही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांता-फॉक्सकॉननंतर आणखी एक टाटा एअर बस निर्मितीचा २२ हजार कोटींची प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित…महाराष्ट्रद्रोही सरकार महाराष्ट्रातील युवकांचे अजून किती नुकसान करणार? यांनी महाराष्ट्र भिकेला लावायचं कंत्राट घेतलं आहे का?,असा सवाल शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील केला आहे.दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल,असेही पत्रात नमूद केले होते.गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरावा झेंडा मिळाला नव्हता.मात्र सरकार सांगते की आम्ही बरेच प्रयत्न केले.आता सत्तेवर नसलेल्या सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत.असे सांगून महाराष्ट्रातील जनतेला शिंदे-फडवणीस सरकार वेडात काढून टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात देण्याचे पाप शिंदे-फडवणीस सरकाराने केले आहे.पण शिवस्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे की,येणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायत,जिल्हापरिषद,या निवडणुकीत शिंदे-फडवणीस यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही.असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close