Uncategorized
पंढरपुरात वीर जिवाजी महाले यांची जयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर -09 ऑक्टोंबर 2022 रोजी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक हिंदवी स्वराज्य भूषण शिवरत्न वीर जीवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे उद्गार काढले होते की, जिवाजी होते म्हणून वाचले शिवाजी. जिवाजी महालेंनी आपल्या राजांसाठी प्राणाची आहुती देऊन स्वराज्य स्थापनेसाठी खारीचा वाटा दिला या वीर मर्द मावळ्याची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्याहस्ते प्रतिमेेचे पूजन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम राष्ट्रीय नाभिक युवक संघटना पंढरपूर शहराध्यक्ष तुकाराम चव्हाण यांनी केलेला आहे.
यावेळी राष्ट्रीय नाभिक युवक संघटना प्रदेशाध्यक्ष सुधीर गाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक सरचिटणीस दत्तात्रय काशिद, राष्ट्रीय नाभिक युवक संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण भांगे, जिल्हा सरचिटणीस, राज्य संघटक जितेंद्र भोसले, ज्येष्ठ समाजसेवक ह. भ.प. बबनकाका शेटे, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ता भुसे, उपाध्यक्ष राजाराम खंडागळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माने, भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, राहुल परचंडे, शिवसेना उपशहराध्यक्ष तानाजी मोरे, शिवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष दत्ता काळे महाराज, आरपीआय पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष पवार, प्रसाद कळसे, विनोद लटके, सोपानकाका देशमुख, शैलेश आगावणे, पांडुरंग शिंदे, दत्ता देवकर, मनोज गावटे, संजय भोसले, विजय माने, अंकुश भोसले, विठ्ठल भोसले, बापू माने, गुरु राऊत, आशिष खंडागळे, गणेश माने, अभिजीत शेटे, अनिल शेटे, विजय साळुंखे, मयूर खंडागळे, पवार सर, सोमनाथ खंडागळे, महेश माने, अनुग्रह चव्हाण, श्रेयस चव्हाण आदी उपस्थित होते.