पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुकाअध्यक्षपदी साबेरा इंगळे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कुरुंदवाड:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शिरोळ तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कुरुंदवाड येथील सौ. साबेरा इंगळे यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे जिल्ह्याच्या बैठकीत प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर बोलताना सौ. साबेरा इंगळे म्हणाल्या महिलांचे संघटन मजबूत करत असताना शासन दरबारी महिलांच्यासाठी असलेल्या अनेक योजनांचा पाठपुरावा करून महिलांना त्याचा लाभ मिळवून देईन.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेंद्र घाटगे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष (वरिष्ठ )गणेश घाटगे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष (युवक) नितीन आवळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष (युवक) बालाजी कदम, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, हातकलंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, हातकलंगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, सामाजिक कार्यकर्ते चांदणे, रवींद्र काळे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन आवळे यांनी मानले.