डॉ.आंबेडकरांचे संविधान बदलाचा घाट सहन करणार नाही -नितीन आवळे

पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र (युवक) कार्याध्यक्षपदी नितीन (भाऊ) आवळे यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे मुसाभाई मुल्ला, गणेश घाटगे, प्रशांत जाधव, रवींद्र हंकारे, रवींद्र काळे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
शिये-( ता.करवीर)- पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली आंबेडकरी विचारधारा असणारी चळवळ जोमाने तळागाळात घेऊन जात असताना सत्ताधाऱ्यांच्या दावणीला गेलेले नेतेे आंबेडकरी विचारापासून फारकत घेत असले तरी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून संविधान बदलाचा घाट कदापि सहन करणार नसल्याचे परखड मत पुरोगामी संघर्ष परिषदेचे नवनिर्वाचित युवकपुरोगामी संघर्ष परिषदेचे नवनिर्वाचित पश्चिम महाराष्ट्र ( युवक )कार्याध्यक्ष नितीन (भाऊ )आवळे यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर येथे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र (युवक) कार्याध्यक्षपदी निवडीनंतर बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेंद्र घाटगे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष (वरिष्ठ) गणेश घाटगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष (युवक) बालाजी कदम, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, शिरोळ तालुका अध्यक्ष युवती साबेरा इंगळे, हातकलंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, हातकलंगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, सामाजिक कार्यकर्ते चांदणे, रवींद्र काळे, इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.