स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या सावित्रीबाई फुले–पांडुरंग रणदिवे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
झेलूनी अंगावरती सेना मातीची घाण दिले विद्येचे ज्ञान लेकी कराया सज्ञान. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे सावित्रीबाईचा विवाह सातारा जिल्ह्यातील कटगुनया गावच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी सावित्रीबाई चे वय अवघे नऊ वर्षाचे होते तर ज्योतिबा यांचे वय तेरा वर्षाचे होते. सावित्रीबाई यांचा विवाह जेव्हा झाला होता तेव्हा त्या आपल्या सोबत ख्रिस्ती मिशनऱ्याकडून भेटलेले पुस्तक सोबत घेऊन जोतिबाच्या घरी आल्या होत्या. त्यावरून जोति रावांना एक नवा मार्ग सापडला .त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यास सावित्रीबाई फुले यांनी मनापासून साथ दिली त्यांच्या कार्यात त्यांनी त्यांच्या बरोबरीने वाटा उचलला.असे विचार पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग रणदिवे यांनी सा.जोशाबा टाईम्स शी बोलताना व्यक्त केले.
.1848 साली स्त्रिया व अस्पृश्यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात काढली .ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या सुरुवातीला त्यांच्या शाळेत पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या .पण एका वर्षात ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोचली. या शाळेची प्रगती पाहून समाजातील अनेक सनातन्यांनी विरोध केला .अंगावर शेण फेकले, दगड चिखल फेकले काही नालायकनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. त्यांना घर सोडावे लागले अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगले नाहीत .अनेक संघर्ष करत त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे कार्य जोमाने चालू ठेवले .म्हणून आज ज्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात चूल आणि मूल याच्यातून बाहेर निघून मान सन्मानाने जगायचा अधिकार मिळाला. ज्या स्त्रियांनी सावित्रीबाईचा आदर्श घेतला व शिक्षणाची खास धरली त्या स्त्री आज डॉक्टर ,वकील, इंजिनिअर, तहसीलदार ,कलेक्टर झाल्या .काही महिला राजकारणात येऊन आमदार, खासदार ,पंतप्रधान ,राष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचल्या ही सावित्रीबाई ची पुण्याई आहे. हे विसरून चालणार नाही. आणि ज्या महिलांनी अंबाबाई ,येडाबाई, माकुबाई यांचा आदर्श घेतला त्या महिला लोकांच्या बांधाला कामाला जातात ही वस्तुस्थिती आहे .म्हणून सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे वाटते .त्या काळात बाला जरठ विवाह प्रथे मुळे अनेक मुली वयाच्या 12 तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केस वपन करून कुरूप बनवले जाई.महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावं लागणाऱ्या यातना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज वाटू लागली .अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी .1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले 1884 पर्यंत 35 ब्राह्मण विधवांची बाळांतपनपार पडली होती .या बालहत्या प्रतिबंध गृहास कोणतीही शासकीय मदत मिळत नव्हती .24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन केला होता .महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज संपला अशी हाकाटी सनातनी लोकांनी पिटली होती. पण सावित्रीबाईंनी पतीच्या मृत्यूनंतर मोठ्या हिमतीने व निष्ठेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले .सासवड येथे सत्यशोधक समाजाची इसवी सन 1893 मध्ये जी विसावी परिषद झाली त्याचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनीच भूषवले होते. सावित्रीबाईंनी शैक्षणिक सामाजिक कार्य करीत मौलिक स्वरूपाची साहित्य निर्मिती केली काव्य फुले ,ज्योतिबाची भाषणे, सावित्रीबाई ची ज्योतिबास पत्रे, 52 कशी सुबोध रत्नाकर, सावित्रीबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज ,महाराणी ताराबाई यांच्यावर काव्यरचना केली आहे. काव्य फुले या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत ,1896 दरम्यान पुण्यामध्ये फ्लेक्स ची साथ पसरली होती हा जीव घेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला या प्लेगच्या साथी मध्ये अनेक लोकांचे हाल व जीव जाऊ लागले अशा वेळी सावित्रीबाई यांनी प्लेग पिढीतासाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यावेळी त्यांनाही फ्लेगच संसर्ग होऊन 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले .सावित्रीबाई बद्दल महात्मा फुले यांचे आद्य चरित्रकार व थोर सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील म्हणतात सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रियांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची तुलना करता येणारे एक ही उदाहरण 19 व्या शतकात सापडत नाही .डॉ.मा.गो. माळी स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या या शब्दात सावित्रीबाईचा उल्लेख करतात. लक्ष्मण खराडी जया हा सावित्री बाईचा विद्यार्थी प्रतिक्रिया नोंदवतो सावित्रीबाई सारखी दयाळू व प्रेमळ अंतकरणाची स्त्री मी अजून सुद्धा पाहिली नाही ती आपल्या आई पेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे. असेच त्यावेळी सर्व मुलांना वाटत होते .अशा या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीस विनम्र अभिवादन.करुन आपण सारे नतमस्तक झाले पाहिजे हिच खरी आदरांजली ठरेल.असे विचार पांडुरंग रणदिवे व्यक्त केले.