Uncategorized
मुस्लिम समाजाच्या वतीने .प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-मुस्लिम समाजाच्या वतीने .प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा सन्मान करण्यात आला.दैनिक पंढरी संचार परिवाराच्या वतीने पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालय येथे सचिन ढोले यांच्या निरोप समारंभ प्रसंगी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मक्का मस्जिद शहर जमात पंढरपूर चे अध्यक्ष निसार भाई शेख, माजी सभापती बशीर भाई तांबोळी, इस्माईल भाई नाडेवाले अध्यक्ष गौसिया मस्जिद (छोटा कब्रस्तान), इस्माईल कडगे (वकीलसाहेब),इब्राहिम भाई बागवान, शफीभाई मुलानी, सईद भाई सय्यद, हबीब भाई मणेरी, रशीद भाई शेख ,जुबेर भाई बागवान,सलमान भाई शेख,असीम शेख इ. उपस्थित होते.