प्रा. परमेश्वर दुधाळ यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच. डी पदवी प्राप्त

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. परमेश्वर सुभाष दुधाळ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची इंग्रजी विषयाची पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. पीएच. डी. पदवीसाठी त्यांनी ‘द मार्जिनल वोईसेस ऑफ वुमेन नॅरेटिव्हस अँड मिथस इन द सिलेक्टेड नोव्हेल्स ऑफ गीता हरिहरन : अ फेमिनिस्ट पर्स्पेक्टीव्ह’ हा विषय निवडला होता. या विषयावरील संशोधनासाठी त्यांना डी. बी. एफ. दयानंद आर्ट्स आणि सायन्स कॉलेज सोलापूर येथील इंग्रजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. तानाजी कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेणकुदळे, महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख व प्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे यांनी अभिनंदन केले.
मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या परमेश्वर दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण श्री परमेश्वर आश्रम शाळा कामती येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नागनाथ महाविद्यालय मोहोळ येथे प्रवेश घेतला. उच्च महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी पूर्ण केले. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
परमेश्वर दुधाळ यांच्या यशाबद्दल प्रोफे. डॉ. अर्जुन मासाळ, प्रोफे. डॉ. समाधान माने, डॉ. दत्ता डांगे, , डॉ. धनंजय साठे, डॉ. विजयकुमार जवान, डॉ. भारत सुळे, डॉ. उमराव मेटकरी आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. दुधाळ यांच्या या यशासाठी त्यांना वडील सुभाष दुधाळ, भाऊ ब्रम्हदेव, ज्ञानेश्वर, राजाराम सलगर व प्रा. सुखदेव धुपे यांनी सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या या यशात त्यांची पत्नी प्रा. सौ. श्वेतांबरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
……………………………………………………………………………


