Uncategorized

पुरोगामी संघर्ष परिषदेचे तासगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

*तासगाव:-* वायफळे तालुका तासगाव येथील गट नंबर 1037 मधील वाढीव गावठाणा मध्ये शासनाने जे प्लॉट विक्रीत केले आहेत ते मोजून दिले नाहीत या व अशा अनेक मागण्यांच्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने तासगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असुन आज उपोषणाचा पहिला दिवस असून शासनाने ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा सौ. पूनम फाळके यांनी घेतली आहे.
सदर उपोषणामध्ये राहिलेल्यांना प्लॉटचे वितरण करा ,अतिक्रमित बांधकामांना नियमित करा, वाढीव गावठाण गट नंबर 1037 मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करा, रस्त्याची सोय करा, बोगस प्लॉटचे वाटपाची चौकशी करा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर आंदोलनास पुरोगामी संघर्ष परिषदेच्या राज्य उपाध्यक्षा सुनीता खटावकर ,राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाशराव फाळके, वरिष्ठ जिल्हाध्यक्षा कुमारी नयना लोंढे, युवतीच्या जिल्हाध्यक्षा सौ वनिता सोनावले, वरिष्ठ जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, युवक जिल्हा अध्यक्ष अक्षय खुडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, हातकणंगले तालुका अध्यक्ष मोहसीन मुजावर इत्यादींनी भेट दिली असून आंदोलनास राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी येऊन भेट देणार आहेत सदर आंदोलन हे राज्य व्याप्ती ठरणार असल्याचे पदाधिकारी बोलत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close