Uncategorized

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज दमदार कामगिरी

पंढरपुर शहरामध्ये बाहेरून येवुन जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले १ पिस्टल,३ जिवंत काडतुस, १ तलवार व १ चाकु जप्त.

 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दिनांक २६/१२/२०२४ रोजी रात्रौ गस्त करीत असताना कराड रोड लगतच्या श्रेयश पॅलेसच्या बाजुला असलेल्या मोकळया मैदानात एक कार अंधारात संशयीतपणे थांबवलेली दिसली. त्याचा संशय आल्याने सदरचे वाहना जवळ जावुन पाहिले असता त्यामध्ये तिन इसम बसलेले दिसले बसलेल्या इसमांना आपण येवढ्‌या रात्री येथे काय करीत आहात गाडीमध्ये कोण कोण आहेत तसेच सदरच्या कारला आपण पाठिमागे नंबर प्लेट का लावलेली नाही असे विचारले असता सुरवातीला त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, आत मध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगीतले असता सदर इसम हे खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जागीच पकडले त्यांचेकडे नाव पत्ता बाबत विचारना केली तसेच मिळुन आलेली स्विफ्ट कार चेक केली असता त्यामध्ये बेकायदेशीर अवैध शस्त्र मिळुन आल्याने त्यांचेकडे सदर शस्त्रांबाबत अधिक चौकशी केली असता वेळापुर येथे राहण्यास असलेला इसम हा पंढरपूर येथे पळुन आला आहे व त्याचा आम्ही शोध घेत आहे असे सांगीतले तसेच यातील आरोपी क. ०१ याचे पुर्व वैमनस्य असल्याचे त्याने कबुल केले असल्याने त्यांचेवर पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.७७८/२०२४ महा. पोलीस कायदा कलम १३५ व बी.एन.एस २०२३ चे कलम ३ (५) ६१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळुन आलेल्या आरोपींची नावे

१) सुखदेव खशाबा दिडवाघ रा शिक्षक कॉलनी, म्हसवड ता मान जि सातारा२) करण बच्चाराम मदने रा भवानी पेठ खटाव ता खटाव जि सातारा३) दिपक दत्तु रूपनवर रा धुळादेव जि सातारा जप्त करण्यात आलेले हत्यार) १ स्टीलचा रामपुरी धारदार चाकु२) १ धारदार तलवार३) १ गावठी ७.६५ एमएमची पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे४) १ पांढरे रंगाची स्वीफ्ट कार, मागे नंबर प्लेट नसलेली, पुढे कमांक एमएच ०६ एडब्ल्यु १३५५सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री.डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोह १६५७ दादा माने, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पो.कॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे, चालक पोका ५०३ बडे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे पो.शि रतन जाधव यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close