फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने 2025 मध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
व्याख्यान मालिका, धम्म परिषद, संविधानाचा अमृत महोत्सव उत्सहात साजरा होणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने शनीवार 28 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जेष्ठ सल्लागार सुभाष ढवळे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सन 2025 साठी विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले.
1)महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिनानिमित्त प्रबोधनाचे कार्यक्रम घेणे.
2)महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक 12व 13एप्रिल दोन दिवस व्याख्यान मालिकेचे घेणे.
3) 18मे रोजी एक दिवसीय “धम्म परिषद ” घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
4)संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष असून “घर घर संविधान “अभियान राबविण्यात येणार असून शहर व तालुक्यात पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली जाणार असून 26नोव्हेंबर रोजी व्यापक असा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कार्यकारिणीत आणखी नवीन सदस्य घेतले असून लोकवर्गणीतून कार्यक्रम यशस्वी केले जाणार असून कार्यक्रमाचे पुढील नियोजनाची बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष सुनील वाघमारे यांनी दिली.
बैठकीचे अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प हार अर्पण करुन तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात येऊन सामूहिक बुद्ध वंदना व त्रीशरण घेण्यात आले.
यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग,परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेला सोमनाथ सूर्यवंशी,दलित पँथर चे जेष्ठ नेते विजय वाकोडे,मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख,NDMJ चे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिवपालक यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

विचार मंचाचे उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे यांचे चिरंजीव रोहन कांबळे यांची MPSC द्वारे समाजकल्याण अधिकारी म्हणुन निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला.
बैठकीला सुनिल वाघमारे,डी.एन. दोडके सर,श्रीकांत कसबे,भालचंद्र कांबळे,एल एस,सोनकांबळे आर.पी.कांबळे, सुनिल सर्वगोड, रविंद्र सर्वगोड,गुरु दोडिया,राजेंद्र पाराध्ये सर,सेवागीरी गोसावी, राजेंद्र सर्वगोड, दिपक चंदनशिवे,संजय सातपुते,राहुल सर्वगोड,हणमंंत बंगाळे,देविदास कसबे,प्रविण दत्तात्रय माने,रोहन कांबळे,शशीकांत बाबर, सुभाष ढवळे सर,उमेश पवार,सिकंदर ढवळे सर,बाळासाहेब सर्वगोड, अजिंक्य व्होवाळ,अनिल माने हजर होते.



