युटोपियन शुगर्स चे चिफ इंजिनियर पतंगराव पाटील यांचे दुःखद निधन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
प्रतींनिधी :- युटोपियन शुगर्स लि.या कार खान्याचे चिफ इंजिनिअर पतंगराव सदाशिव पाटील मंगळवार दिनांक 05/07/2022 रोजी सकाळी साडे नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. युटोपियन शुगर्स च्या उभारणी मध्ये ही त्यांचे मोलाचे योगदान होते. सन 2013 कारखाना उभारणी ते आतापर्यंत साहेबांनी एक यशस्वी चिफ इंजिनिअर म्हणुन काम केले . तल्लख बुद्धी व ग्राउंड लेवल मधे काम केल्यामुळे प्रचंड अनुभव व विलक्षण स्मरण शक्ति व मनमिळावू स्वभाव ही त्यांची खास ओळख असल्याने ते कर्मचारी प्रिय चिफ इंजिनिअर म्हणून साखर परिवारात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
यांच्या अकाली जाण्याने युटोपियन परिवार एका चांगल्या चिफ इंजिनिअर ला मुकला असल्याची भावना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दू:खाचा जो डोंगर कोसळला आहे त्यामध्ये परिचारक कुटुंबीय व संपूर्ण युटोपियन परिवार सहभागी असून त्यांना या दू:खा मधून सावरण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना परिचारक यांनी व्यक्त केली आहे.



