अनवाणी पायांना चपलाचे वाटप… विद्यार्थ्यांना वह्या, कंपास आणि पेन इ. शैक्षणिक साहित्याचे भरगच्च वाटप..!
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
भोसे ता- पंढरपूर येथील युवकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी, सर्व लहानथोरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेगाव ते मुंबईपर्यंत
अनवाणी चालणारे अण्णाभाऊ साठे दीड दिवसाची शाळासुद्धा नीट शिकले नाहीत त्यामुळे निरक्षर राहिले. त्यानंतर ते जगाच्या आणि अनुभवाच्या शाळेत शिकले. तलवारीपेक्षा तळपदार असणाऱ्या त्यांच्या लेखणीने सर्वसामान्यांना नायक बनवले. वंचितांच्या आणि दुःखीतांच्या वेदना आपल्या दमदार लेखणीच्या माध्यमातून त्यांनी जगाच्या वेशीवरती टांगल्या. अनवाणी चालत जाणारे अण्णाभाऊ प्रचंड बुद्धिमत्ताच्या जोरावरती चितोडची राणी विमानाने रशियापर्यंत जाऊन पोहोचले,त्यांची लेखणी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. त्यामुळे अण्णा भाऊ हे’नाचून नाही तर वाचून चांगले समजतात’.त्यांचा खरा आदर्श भोसे येथील युवकांनी घेतला असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी मांडले.

यावेळी मंचावरती सुनिल अडगळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान वायदंडे, प्रवचनकार नागनाथ अडगळे,डॉ.एस.एस.पाटोळे, दादासाहेब तळेकर, जगताप साहेब,विजय साळुंखे,सह्याद्री सरडे,डॉ.किरण शिंदे,सचिन पाटील दिनेश सरडे,अतुल जमदाडे, सुनिल भिंगारे,अर्जुन आसबे,समाधान गायकवाड ,राहुल गायकवाड,परमेश्वर अडगळे ,अनिल अडगळे, विठ्ठल अडगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रणदिवे यांनी भोसे येथील युवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊन सर्वांनीच अशा रीतीने सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात,असा संदेश दिला.
यावेळी दादासाहेब तळेकर, नागनाथ अडगळे यांचीही समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान गायकवाड,राहुल गायकवाड,विजय अडगळे, प्रशांत अडगळे आदी सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल अडगळे यांनी तर सूत्रसंचालन समाधान गायकवाड यांनी केले.


