डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गरुडझेप घेतात -नूतन अभियंता आकाश चव्हाण
स्वेरीत उपविभागीय जलसंधारण अधिकारी आकाश चव्हाण यांचा सत्कार

छायाचित्र- स्वेरीचे माजी विद्यार्थी आकाश चव्हाण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून क्लास वन ऑफिसर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते स्वेरीमध्ये आले होते तेंव्हा त्यांचे स्वागत व सत्कार करताना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सोबत डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, आकाश यांचे वडील शिवाजी चव्हाण, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार व अभियंता निखील बागल आदी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘स्वेरीत प्रवेश घेतल्यानंतर व येथील संस्कार आत्मसात केल्यानंतर, डॉ. रोंगे सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षा देत गेलो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत गेल्यामुळे आजचे यश मी पाहू शकलो. स्वेरीत योग्य व अचूक मार्गदर्शन होत असल्यामुळे आज मी यशाच्या शिखरावर पोहोचलो असून डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाने आणखी पुढे मार्गक्रमण करत राहणार आहे.’ असे प्रतिपादन नुतन उपविभागीय जलसंधारण अधिकारी आकाश चव्हाण यांनी केले.
स्वेरीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर जलसंधारण (वॉटर कॉन्झरवेशन) या विभागामध्ये अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून क्लास वन ऑफिसर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते स्वेरीमध्ये आले होते. यावेळी त्यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आकाश चव्हाण हे स्पर्धा परीक्षेत मिळालेल्या यशाचे गमक उलगडत होते. या प्रसंगी आकाश चव्हाण यांचे वडील शिवाजी चव्हाण, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, अभियंता निखील बागल आदी उपस्थित होते. नूतन अभियंता व उपविभागीय जलसंधारण अधिकारी आकाश चव्हाण पुढे म्हणाले की, ‘स्वेरीची एक स्वतंत्र शिक्षण संस्कृती असून आपण नेहमी ठरवतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्तम करिअर स्वेरीतील मार्गदर्शनातून घडते. सुरुवातीला शिस्त नकोशी वाटायची परंतु आज त्याच शिस्तीमुळे यश मिळाले. डॉ. रोंगे सर आणि विभागातील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच आज मी क्लास वन ऑफिसर होऊ शकलो.’ अशी प्रतक्रिया आकाश चव्हाण यांनी दिली. आटपाडी (जि.सांगली) मध्ये स्थायिक असलेले आकाश शिवाजी चव्हाण यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आटपाडी मधील गदिमा हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण सायन्स शाखेतून झाले.२००९ साली त्यांनी स्वेरी संचलित अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंग मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या कालावधीत प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर, डॉ. प्रशांत पवार सर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळाले. नियमित शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी देखील त्यांनी करून घेतली. वसतिगृहात राहत असताना रात्र अभ्यासिकेचा खूप फायदा झाला. आकाश चव्हाण यांचे वडील शिवाजी चव्हाण हे निवृत्त बस कंडक्टर असून आई सौ. संगीता या गृहिणी आहेत. दोन नंबरचे बंधू अनिकेत चव्हाण हे एम. टेक. नंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत तर सर्वात लहान बंधू विवेकानंद चव्हाण यांनी बी.टेक. नंतर प्रशासकीय क्षेत्रात पाऊल टाकले असून ते तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एकूणच प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे मला क्लास वन अधिकारी होता आले. सध्या त्यांची सब डीव्हीजनल वॉटर कॉन्झरवेशन विभागात वॉटर कॉन्झरवेशन, क्लास वन ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांची क्लास वन ऑफीसर म्हणून निवड झाल्यामुळे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी जलसंधारण अधिकारी आकाश चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.