आदिवासींच्या अतिक्रमित घरांचे नियमित घरकुलात रूपांतर करणार—जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
धरणगांव :-जिल्हा जळगांव) यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी धरणगाव येथील आदिवासी विभागांमध्ये पाहणी करत असताना सांगितल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासीनी अतिक्रमित वस्ती स्थापन करून रहिवासी झाले आहेत त्यांच्या घरांचे नियमित घरकुलात रूपांतर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा सुधार योजनांचा लाभ मिळण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी वस्ती व पाड्यावर जाऊन प्रबोधन करणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ जळगाव जिल्हाध्यक्ष विक्रम चव्हाण यांनी दिली.
ते धरणगाव येथील आदिवासी वस्तीतील समाज बांधव समोर मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र वरिष्ठ अध्यक्ष जितेंद्र चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
यावेळी धनलाल चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण ,दिनेश पवार, विकास साळुंखे, आकाश पवार ,अजय पारधी, मुकेश चव्हाण ,जनक चव्हाण, अशोक भिल इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार दशरथ पारधी यांनी मानले.