Uncategorized

कालकथीत मा.धो.खिलारे यांना प्रथम स्मृतीदिनानिमीत्त मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली!

त्यांचे कुटुंबाने दिली मातंग समाजाला प्रेरणा...

डावीकडुन जोतीबा पाखरे,श्रीकांत कसबे, अंबादास वायदंडे, अँड.शिवराज कोळीकर,सतिश कसबे,आयुष्यमती  शांता मारुती खिलारे व कन्या  ,आयुष्यमती  वर्द्रषाराणी चंद्रकांत साळवे,आयुष्यमती  मालिनी योगेश वाळके ,आयुष्यमती  माधवी मारुती खिलारे , आदरांजली अर्पण करताना..

जोशाबा टाईम्स वेब  न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ या महामानवांचा मानवतावादी विचार मातंग समाज व इतर शोषित वंचित समाजात रुजावा यासाठी प्रामाणिकपणे लेखन व संघटनात्मक कामाच्या माध्यमातून रुजवण्यासाठी प्रशासकीय सेवेत राहुन प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारे   पुर्वाश्रमातील  मातंग समाजातील परिवर्तन चळवळीचे प्रामाणिक,अभ्यासू लेखक व अधिकारी कालकथीत मा.धों.खिलारे साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.

खिलारे साहेबांनी २००६मध्ये दीक्षा भुमी नागपुर येथे सहकुटुंब धम्माची दीक्षा घेतली होती.त्यामुळे त्यांचा स्मृतीदिन बौध्द धम्माची विधी होऊनच साजरा व्हावा अशी कुटुंबाची ईच्छा होती.त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते.

(माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, श्रीकांत कसबे, विलास जगधने  सर,अंबादास वायदंडे)

यावेळी तथागत गौतम बुध्द,डाँ. बाबासाहेब आंबेडकर, व कालकथीत मा.धो.खिलारे यांचे प्रतीमेस पुष्प व पुष्प माला खिलारे साहेबांच्या पत्नी आयुष्यमती  शांता मारुती खिलारे व कन्या  ,आयुष्यमती  वर्द्रषाराणी चंद्रकांत साळवे,आयुष्यमती  मालिनी योगेश वाळके ,आयुष्यमती  माधवी मारुती खिलारे , यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी भन्ते विलास जगधने सर यांनी बुध्दवंदना घेतली.नंतर सर्वांनी सामुहिक त्रिशरण, पंचशिल ग्रहण केले.जगधनेसर यांनी आपल्या अमोघ वाणीतुन प्रवचनाद्वारे उपस्थीतांचे प्रबोधन केले.

यावेळी” चलो बुध्द की ओर” अभियानाचे सक्रिय मार्गदर्शक अँड. शिवराज कोळीकर नांदेड,फकिरा दलाचे राज्याध्यक्ष सतीश कसबे उस्मानाबाद,  जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.शेवटी सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले.

याप्रसंगी  माजी नगरसेवकद्वय अंबादास वायदंडे, कृष्णा वाघमरे,पंढरपुर,फकिरा दल जिल्हाध्यक्ष जोतीबा पाखरे,मंगळवेढा पंचायत समिति सदस्य लक्ष्मण(तात्या)मस्के गोविंद कांबळे यांचे सह अनेक मान्यवर व खिलारे साहेंबांचे नातेवाईक व प्रेमी  उपस्थीत होते.

या कार्यक्रमामुळे मांतग समाजात निश्चिंतच धम्माविषयी सकारात्मक द्रृष्टीकोन निर्माण होणार असुन यामुळे समाजाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close