सामाजिकशास्त्रे आणि शाश्वत विकास ’ या विषयावर ‘कर्मवीर’मध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत इतिहास, अर्थशास्त्र व शिक्षणशास्त्र या विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे गुरुवार दि. १९ मे २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी या चर्चासत्रास संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कांबळे उपस्थित राहणार असून ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन सोशल सायन्सेस पर्स्पेक्टीव्ह विथ इम्फसिस ऑन एज्युकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘रोल ऑफ एज्युकेशन इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’या विषयावर, विजयपूर येथील कर्नाटक स्टेट अक्कमहादेवी विमेन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर व संशोधन मार्गदर्शक डॉ. विष्णू मायाप्पा शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर गव्हर्मेंट विदर्भ इन्स्टीट्युट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज अमरावती येथील इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. घन:शाम महाडिक हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ह्युमन कल्चर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सांगोला येथील सांगोला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आप्पासाहेब पुजारी हे ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड वाटर मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी फी आकारली नसून सर्वांसाठी ती मोफत आहे. मात्र त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अशी माहिती चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. मधुकर जडल यांनी दिली आहे.