Uncategorized

स्वेरीत हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

 

छायाचित्र- ‘हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सोबत डावीकडून प्रा. प्रदीप जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, पुस्तकाचे लेखक डॉ. वृणाल मोरे, सचिव डॉ.बी.पी.रोंगे व प्रा. रामदास नाईकनवरे.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- डॉ.मनोज नितळीकर (कासेगाव, जि.सांगली), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ.वृणाल मोरे, प्रा. विजयकुमार चाकोते व निलंगा (जि.लातूर) येथील प्रा.पूजा डहाळे यांनी मिळून लिहिलेल्या ‘हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी’ या पुस्तकाचे नुकतेच स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
स्वेरीमध्ये नेहमी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देत असताना केवळ शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षित करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे एवढाच हेतू नसून स्वेरीतील शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करत असताना त्यांना उच्च शिक्षण देखील घेण्याचा अट्टाहास स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे सर हे नेहमीच धरत असतात. त्यांच्या या मार्गदर्शनानेच फार्मसीच्या प्राध्यापकांकडून फार्मसीच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक बी.फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तकाचे प्रकाशन प्रितम पब्लिकेशन, जळगाव यांनी केले असून हे पुस्तक तब्बल १५७ पानी आहे. या पुस्तकातील सर्व अभ्यासक्रम हा पाच युनिटमध्ये विभागण्यात आला आहे. यामध्ये मुख्यतः आयुर्वेदिक वनस्पतींचे सखोल विश्लेषण केले आहे. तसेच आयुर्वेदा, सिद्धा, युनानी व होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीची सविस्तर माहिती मुळ तत्वानीशी समाविष्ट केली आहे. पुस्तकाच्या पुढील प्रकरणात वनऔषधांचे तसेच औषधांचा सौंदर्यप्रसाधनांमध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो याबाबत सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. वनऔषधी वनस्पतींचे, पदार्थांचे पेटंट कसे फाईल करता येईल व त्यासंदर्भात लागणाऱ्या बाबींची माहिती देखील या पुस्तकात नमूद करण्यात आली आहे. पुस्तकात शेवटच्या टप्प्यावर वन औषधी वनस्पतींपासून विविध औषधे बनविण्यासाठी उभारण्यात येणारे औद्योगिक कारखाने या बाबतीतील माहिती विस्तृत स्वरूपामध्ये समाविष्ट केली आहे. प्रत्येक युनिट नंतर बहुपर्यायी प्रश्न हे उत्तरासहित समाविष्ट केले असून याचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी होणार आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक लिहिल्यामुळे चारही लेखकांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close