कासार विचार मंचच्या वतिने राज्य व आंतरराष्ट्रीय वधू वर परिचय मेळावा पंढरपुरात ८मे रोजी होणार..
कासार विचारमंचच्या पदाधिकार्यानी दिली पत्रकार परिषदेत माहीती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-कासार समाजातील उपवर वधू वरांच्या लग्नाची समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर वधू वर मेळाव्याचे नियोजन ८ मे रोजी भक्तीमार्ग उंच विठोबा पिछाडीस सावता माळी नगर पंढरपूर येथें आयोजीत करण्यात आल्याची माहीती मंच चे अध्यक्ष गजानन मोहिरे कर्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्टातील कासार समाजातील मान्यवरांनी कासार विचार मंच हि सामाजिक संस्था २००६मध्ये स्थापन करुन अधिकृत नोंदणी केलेली संस्था असुन समाजातील शैक्षणीक, आरोग्य विषयक,रोजगार आणी स्वंयरोजगार,मार्गदर्शन, नैसर्गिक आणी आकस्मिक आपत्तीमध्ये विवीध प्रकारचे सहाय्य आणी सहकार्य ,शिक्षण आणी प्रशिक्षण संस्था स्थापनकरणे,वारकरी भवन स्थापन करणे इत्यादी उद्देशाने कासार विचार मंच काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे संचालक प्राचार्य बाबूराव मैदर्गे यांनी वधू वर परिचय मेळाव्याबाबत सविस्तर माहिती दिली.एकुण सहाशेपेक्षा जास्त वधू वरांची नोंदणी झाली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक यांचेसह परदेशातील काही जणांनी नोंदणी केली असून त्यांचा परिचय आँनलाईन पध्दतीने होणार असून पाच हजारापेक्षा जास्त लोकांचा सहभाग या मेळाव्यात होणार असून सहभाग घेणार्या सर्व वधूना साडी भेट देण्यात येणार असुन यावेळी पसंद विवाह समुपदेशन करुन जुळविण्यात येणार असून त्याच दिवशी संमती असेल तर मोफत विवाह लाऊन देण्यात येणार आहेत.
या मेळाव्याचे उद्घाटन परर्यावरण,पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार व अर्बन बँकेचे व पांडूरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक हे असणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपुर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी राज्याध्यक्ष गजानन मोहिरे(कराड) उपाध्यक्ष संजीव कोकीळ(मुंबई)बाळासाहेब मोहोळकर (फलटण)कार्यवाहक कालिदास अष्टेकर(औरंगाबाद) खजिनदार रविंद्र मोहीरे (मुंबई)स्वागताध्यक्ष विलास हरपळे(सोलापुर) कार्यकारीणी सदस्य देवेंद्र रणभरे(मुंबई), प्राचार्य बाबुराव मैंदर्गी(लातुर)डाँ. रमाकांत दगडे(कोल्हापुर) प्रशांत मांगुळकर(उदगीर)प्रा.अशोक डोळ(पंढरपुर) जयप्रकाश दगडे(लातुर)आजिव सदस्य संजय डोळ(कराड) भारतशेठ कोकीळ (अकलूज) सुनिल रासणे (पुणे)रत्नाकर कोळपकर(शिरुर घोडनदी) भारत लोखंडे(नांदेड)शिवराज आंदोले(परभणी) अभय थिटे,चंद्रकांत शिरापुरे(मालेगांव)सतिश शेटे (लातुर) प्रा.सुभाष दगडे (पुणे) आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.तरी या कार्यक्रमास सर्व वधू वर माता, पिता बंधु भगीनीनी उपस्थित रहावे असे आवहान करण्यात आले आहे.यावेळी कार्यवाहक कालिदास अष्टेकर, भारत कोकीळ,सतीश शेटे, प्रशांत वेळापुरे,प्रा.अशोक डोळ उपस्थित होते.शेवटी आभार प्रा.प्रा.सुभाष दगडे यांनी मानले.