महामानव डाँ. बाबासाहेब आबेडकर जयंतीदिनी रमाईनगर फलकाचे उद्घाटन
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटनेने महापुरुषांची जयंती साजरी करुन राबविला उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना शाखा क्र.२चे वतिने नविन मंगळवेढा रोड पाणी टाकी जवळ ” राष्टपिता महात्मा फुले व राप्टनिर्माते डाँ. बाबासाहेब आंबेडकर ” यांची जयती उत्सहाने साजरी करण्यात आली तसेच झोपडपट्टीचे नामकरण संघटनेच्या कार्यकर्त्यानी रमाईनगर असे केले होते.त्या फलकाचे उद्घाटन संघटनेचे आधारस्तंभ माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांनी केले.
राष्टपिता महात्मा फुले व राप्टनिर्माते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सकाळी पुजन पंढरपुर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बागाव व दामीनी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक प्रशांत भागवत यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप उपस्थित होते.
तर सांयकाळी पुजन व अभिवादन पंढरपूरचे विभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम यांनी केले.
त
यावेळी जोशाबा टाईम्स चै संपादक श्रीकांत कसबे ,शाखेचे अध्यक्ष अजय तुपसौंदर,विशाल तुपसौंदर, अनिल कांबळे, सुरेश बिनवडे,जीवन कांबळे, माजी उपनगराध्यक्ष दयानंद वायदंडे, दत्ता लोंढै,बापू खिलारे,मार्तंड कांबळे, व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.