कांबळे परिवारांचे वतिने डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विवीध उपक्रमाने साजरी
बालशाहिर श्रुती कांबळे ने पोवाड्यातुन केले प्रबोधन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर-ओम मोटर्सचे चालक लक्ष्मण कांबळे यांनी परिवारासोबत महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी केली.त्यांची पाचवित शिकणारी कन्या श्रुती हिने बाबासाहेबांवर आधारीत पोवाड्यातुन प्रबोधन करुन उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.
मा.नगरसेवक अंबादास वायदंडे,जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे,सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघमारे श्रीमती यशोदाबाई कांबळे, रेश्मा गाडे मँडम,वनिता कांबळे, सौ.गायत्री कांबळे, योगेश विटेकर बापु कांबळे संजय कांबळे यांचे हस्ते यावेळी २० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच दोन विद्यार्थीनींना सायकल भेट देण्यात आल्या.
डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका ! संघटीत व्हा !! संघर्ष करा हा !!! संदेश दिला .तो प्रत्येकानी आत्मसात केला पाहीजे व आपापल्या परिने कर्तव्य केले पाहीजे भावनेने आपण हा उपक्रम आमचे परिवारांचे वतीने आज राबविला असल्याची भावना आबा कांबळे यांनी व्यक्त केली.
यावेळी कांबळे परिवार व परिसरातील मान्यवर ,पालक आदी उपस्थित होते.शेवटी सर्वांना मिष्ठान्न देण्यात आले.