पंढरपूरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर दि. १४- भारतीय राज्घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लोकोउत्सव म्हणून साजरी करण्यात यावी. आजचा हा दिवस अभिमानाचा दिवस असून, समाजात एकता, अखंडता आणि बंधुभाव अबाधित राहण्यासाठी आंबेडकरांचे कार्य आणि विचार आचरणात आणणे आवश्यक असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जितेंद्र बनसोडे, सुनील सर्वगोड,संतोष पवार,जे.के गायकवाड, बाळासाहेब कसबे, राजू सर्वगोड, आप्पा जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.