हॅण्डीकॅप असोसिएशनच्या आकुताईने पटाकाविले कांस्य पदक

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ओरीसा येथील भुवनेश्वर मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रिडा स्पर्धेमध्ये येथील हॅण्डीकॅप असोसिएशनची खेळाडू आकुताई उलभागत हिने थाळी फेक प्रकारात कांस्य पदक पटाकाविले.

सदर स्पर्धेसाठी राज्यातून ४५ दिव्यांग खेळाडुंचा संघ ओरीसामध्ये दाखल झाला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आकुताई हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. डार्फ गट अर्थात कमी उंचीच्या गटात सामने झाले यामध्ये गोळाफेक प्रकारामध्ये तीने तिसरा क्रमांक पटकाविला.
दरम्यान मुळची पंढरपुर तालुक्यातील शेवते येथील आकुताई ही गेल्या आठ वर्षा पासून येथील हॅण्डीकॅप असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी देशपांडे यांच्याकडे वास्तव्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आकुताई हिने आज पर्यंत विविध स्पर्धांमध्ये १४ बक्षिसे मिळवली आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या आकुताई ने आपल्या मर्यादावर मात करीत एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून अद्याप पुढील शिक्षण घेत आहे. विविध क्रिडा स्पर्धामध्ये यश मिळवत छत्रपती क्रिडा पुरस्कार पटकाविण्याचे आकुताई हिचे स्वप्न आहे. या यशाबद्दल आकुताई उलभागत हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






