Uncategorized

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने  विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

14 एप्रिल 2022 रोजी पंढरपुरात भव्य सन्मान सोहळा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान 131 वी जयंती महाउत्सव समितीच्यावतीने दि.14 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवतीर्थ येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 40 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे.  तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहर व तालुक्याचे नावलौकिक केल्याबद्दल 40 मान्यवरांचा विशेष सन्मान, पंढरपूर शहरातील सर्व पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष यांचा व कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय मदतकार्य केल्याबद्दल पंढरपूर शहर व तालुक्यातील 40 कोरोना योध्दांना पुरस्कार देवून व पंढरपूर नगरपालिकेच्या 40 आशा वर्कर महिला यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मान करून साडी वाटप करण्यात येणार आहे. “निळे वादळ’ हा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम होणार आहे, तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी केले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे (सर), जयंती समिती अध्यक्ष सुरेश नवले, स्वागताध्यक्ष भाई नितीन काळे, आण्णा धोत्रे, आदम बागवान, प्रतिक सर्वगोड, तानाजी मोरे, आकाश फडतरे, रूपेश वाघमारे, अभिषेक सर्वगोड, सचिन नेहतराव, सल्लागार रामदासदादा सर्वगोड, विलास जगधने सर, प्रा.सुदाम गायकवाड सर, आनंद थोरात, सौ.निशा फुले- देवमारे आदि उपस्थित होते.
प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या खालील 40 मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. 1) प्रबुध्द पुरस्कार “विधिज्ञ’ ऍड.विजयकुमार नागटिळक 2) महर्षि वाल्मिकी “शौर्यरत्न’ पुरस्कार – अर्चना बिपीन परचंडराव 3) वर्धमान महावीर “अंहिसारत्न’ पुरस्कार- डॉ.राजेश फडे, 4) राष्ट्रसंत रोहिदास महाराज “प्रबोधनरत्न’ पुरस्कार- ज्ञानेश्वर कांबळे 5) छत्रपती शिवाजी महाराज “प्रशासनरत्न’ पुरस्कार- प्रा.एम.एम.पवार 6) राजमाता अहिल्यादेवी होळकर “उद्योगरत्न’ पुरस्कार- दिपाली ठवरे 7) महात्मा बसवेश्वर “समाजभुषण’ पुरस्कार- विशाल आर्वे 8) राष्ट्रपिता महात्मा फुले “समाजरत्न’ पुरस्कार- संजयबाबा ननवरे, संजय वाघमारे, दुर्गा माने 9) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “शिक्षणभूषण’ पुरस्कार- शुभांगी क्षिरसागर, संध्या काळे, डॉ.राजश्री भोसले 10) राष्ट्रसंत गाडगे महाराज “शिक्षणरत्न’ पुरस्कार- भगवानराव महाडिक , मोहन लवटे, विजयकुमार वाघमोडे, 11) नारायण मेघाजी लोखंडे “कामगाररत्न’ पुरस्कार- ज्ञानेश्वर वाघमारे  12) डॉ.सी.के.बोले “वैद्यकीयरत्न’ पुरस्कार- डॉ.अरविंद गिराम 13) राजश्री शाहू महाराज “क्रीडारत्न’ पुरस्कार- माधव शेरीकर 14) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया)- प्रशांत आराध्ये 15) विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर “ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया)- राजाभाऊ शहापूरकर 16) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया)- संतोष रणदिवे, प्रविण नागणे, प्रमोद बनसोडे 17) आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर “युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया)- माऊली डांगे, सुरज सरवदे, सचिन झाडे 18) साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे “साहित्यरत्न’ पुरस्कार- भारत दत्तात्रय खिलारे, अमर कांबळे, राजेंद्र ढवळे,  19) महाकवी वामनदादा कर्डक “कलारत्न’ पुरस्कार – रविंद्र शेवडे 20) डॉ.पंजाबराव देशमुख “कृषीरत्न’ पुरस्कार- रामदास खराडे 21) भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या “स्थापत्यरत्न’ पुरस्कार – रविकांत भगवान ढावरे  22) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम “विज्ञानरत्न’ पुरस्कार – डॉ.सचिन बंगाळे 23) माता जिजाऊ “आदर्श माता’ पुरस्कार – जयश्री दिपक शुक्ला 24) माता रमाई “आदर्श पत्नी’ पुरस्कार – कविता दत्तात्रय खडतरे 25) वीर शिवा काशीद “विररत्न’ पुरस्कार- प्रा.मारूती भोसले सर 26) कर्मवीर भाऊराव पाटील “जीवन गौरव’ पुरस्कार- डॉ.ज्ञानेश्वर शिंदे,समाधान घाडगे सर यांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.नगरसेवक डि.राज. सर्वगोड यांनी दिलेली आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close