घरकुल योजनेतून मिळालेल्या घरकुलची सिटीसर्वेला नोंद करा पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी

पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने मल्लेवाडी (ता.मिरज) चे सरपंच विनायक पाटील यांना निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, तालुकाध्यक्ष भास्कर खिलारे इत्यादी
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मल्लेवाडी:- (ता.मिरज) घरकुल योजनेतून मिळालेल्या घरांची नोंद ग्रामपंचायतीला असते परंतु सदर नोंदीचा ८अ चा उतारा ऑनलाईन दिसत नाही त्याचीही दुरुस्ती करून घरकुल योजनेतून मिळालेल्या व ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेची मालकी हक्काप्रमाणे सिटी सर्वे कार्यालयात सुद्धा नोंद झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन मिरज तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मल्लेवाडी (ता.मिरज) ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक पाटील यांना दिले असून सदर नोंद न झाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिरज तालुका अध्यक्ष भास्कर खिलारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले. यावेळी युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, वरिष्ठ जिल्हा सरचिटणीस सर्जेराव भंडारे, कार्यकारिणीचे सदस्य मल्हारी भंडारे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिष्टमंडळात महेश कांबळे, दीपक माने ,सुबराव कांबळे, अमोल साठे, रोहित भंडारे ,बापूसाहेब भंडारे, पंकज भंडारे, चंदर जकाते, अभिजीत भंडारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर मागणी दहा दिवसात जर मान्य नाही झाली तर ग्रामपंचायतीवर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.





