Uncategorized

कर्मवीर’मध्ये मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी शिबीर संपन्न

‘हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे , सोबत उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे व इतर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे


पंढरपुर-प्रतिनिधी: महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. घर कामात सातत्त्याने व्यस्त राहिल्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ भेटत नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. कामाच्या धावपळीत आहार आणि व्यायाम याकडे पुरेसे दुर्लक्ष होते परिणामी अनेक व्याधीनं सामोरे जावे लागते.” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे पुढे म्हणाले की, “उत्तम आरोग्याचे निदान हे रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून काढता येते, हिमोग्लोबिन हे आरोग्याचे दिशादर्शक असते. शिक्षित महिलांमध्ये याबाबतची जाणीव जागृती झाली पाहिजे.” या शिबिरात वैद्यकीय क्षेत्रातील सिद्धांतानुसार डीजीटल हिमोग्लोबिनो मीटरच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिलांचे हिमोग्लोबिन व बी. एम. आय. ची देखील तपासणी करण्यात आली. ज्यांची हिमोग्लोबिन पातळी कमी दिसून आली अशांना योग्य आहार सुचविण्यात आला. या शिबिरात एकशेवीस पेक्षा अधिक विद्यार्थी व महिला यांनी सहभाग नोंदविला.


या शिबिराचे प्रास्ताविक डॉ. अमर कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समृध्दी सावंजी व विपुल गोसावी यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अमोल ममलय्या, अक्षय माने, प्रदीप गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. कु, श्वेता तेली यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close