आंबे ता.पंढरपूर येथे पोलीसांची वाळु तस्करांवर कारवाई

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मा.पोलीस अधिक्षक श्रीमती सातपुते मॅडम,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिंमतराव जाधव सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विक्रम कदम सो, पोलीस निरिक्षक श्री सर्जेराव पाटील सो, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण पोलीस निरिक्षक श्री मिलिंद पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.फौ.म.ईसाक अब्बास मुजावर,पो.हे.कॉ./517 नारायण रामचंद्र गोलेकर,पो.हे.कॉ./387 धनाजी देविदास गाडे, पो.कॉ.1002 अक्षय सुहास दळवी,पो.कॉ.चापोना 533 समिर अहमद शेख सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण तसेच पंढरपुर तालुका पोलीस ठाणे कडील पो.हे.काँ./1088 सय्यद,पो.ना./1698आटपाडकर,पो.ना./212 ताटे यांनी मौजे आंबे ता.पंढरपूर येथील भीमा पात्रातुन यारीच्या साहय्याने होत असलेल्या अवैद्य वाळु उपसा ठिकाणी छापा टाकुन 1) 5,00,000 /-रुपये त्यात एक निळ्या रंगाचा फार्मट्रक कंपनीचा ट्रँक्टर त्यावर MH13J6582असा नंबर असलेला व ट्रँक्टरचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी यारीसह आ.जु.वा.कि.अं.2) 80,000/-रु त्यामध्ये वरील ट्रँक्टर क्र MH13J6582 बाजुला चे बाजुला साठा करुन ठेवलेली अंदाजे 20 ब्रास वाळु 4000रु प्रति ब्रास किं.अ.3)5,00,000 /-रु त्यात एक लाल रंगाचा स्वराज855 कंपनीचा ट्रँक्टर त्यावर MH13AJ2301असा नंबर असलेला व ट्रँक्टरचे पाठीमागे बाजुस नदी पात्रातुन वाळु उपसा करणेकरिता वापरण्यात येणारी यारीसह आ.जु.वा.कि.अं.4)1,20000/-रु त्यामध्ये वरील ट्रँक्टर क्र MH13AJ2301 चे बाजुला एका ढिगाऱ्यात साठा करुन ठेवलेली अंदाजे 30 ब्रास वाळु 4000 रु प्रति ब्रास किं.अ.5)2,00,000/-रु त्यामध्ये वरील ट्रँक्टर क्र MH13AJ2301 चे बाजुला दुसऱ्या ढिगाऱ्यात साठा करुन ठेवलेली अंदाजे 50ब्रास वाळु 4000 रु प्रति ब्रास किं.अ.असा एकुण 14,00000/-रुपयाची वाहने व 100 ब्रास वाळु मिळून आला असून अवैधरित्या वाळु करणारे इसम नामे आरोपी 1) नाना वसंत गाजरे वय-21वर्षे रा.शेळवे ता.पंढरपुर 2) दत्ता लक्ष्मण माने रा-तांदुळवाडी ता.पंढरपुर 3)नागेश आण्णा शिंदे रा.आंबे ता.पंढरपुर 4)ज्ञानेश्वर पुर्ण नाव पत्ता माहित नाही.5)तानाजी शिवाजी शिंदे रा.आंबे ता.पंढरपुर 6) ट्रँक्टर क्र MH13J6582 चा अज्ञात चालक व मालक .7) ट्रँक्टर क्र MH13AJ2301चे अज्ञात चालक व मालक यांचे विरूध्द भा. द. वि. कलम 379,34 सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे पो.हे.कॉ./ 387 धनाजी देविदास गाडे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक श्री.मिलिंद पाटील सो,यांचे मार्गदर्सनाखाली पो.ना.अशोक भोसले हे करित आहेत.






