Uncategorized

मातंग समाजाच्याप्रश्नी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ ना. जयंत पाटलांना भेटणार–सौ स्वाती सौंदडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगली:- पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील यांना भेटणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
सौ स्वाती सौंदडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाची होत असलेली फरफट थांबविण्यासाठी, अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रामुख्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रखडलेले स्मारक अशा अनेक विषयावर राज्यातील 50 सदस्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close