कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी मध्ये राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न..


1) उद्घाटक: सुरेशं कराडे ( कोल्हापूर)
२) प्रा डॉ. यशवंत राऊत (धारवाड विद्यापीठ कर्नाटक)
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-संपादक-श्रीकांत कसबे
(डाँ.रामदास नाईकनवरे)
आटपाडी दि. २८जानेवारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित, श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, “साहित्य निर्मिती लेखन प्रक्रिया” या विषयावर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन धारवाड विद्यापिठातील मराठी विभाग प्रमुख, अभ्यासक, संशोधक व साहित्यिक डॉ. यशवंत राऊत यांनी केले.
साहित्य निर्मितीची मूलतत्त्वे नवोदित लेखकांनी लक्षात घेतली पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रतिभा, उत्स्फुर्त्ता, कल्पना, संकलन,स्मरण या मूलतत्त्वांचे शास्त्रीय विवेचन त्यांनी केले .तर कार्य शाळेमधील दुसरे वक्ते ज्येष्ठ साहित्यिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष अशोक पवार यांनी लेखकाच्या समृद्ध अनुभव विश्वावर भाष्य करून साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांनी व कवींनी समकालीन उपेक्षित व वंचित घटकांच्या वेदना दुःख व मनातील घुस्मठ अजूनही तिव्रतेने साहित्यामधून येणे आवश्यक आहे केले असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्राचार्य व ज्येष्ठ साहित्यिक कवी व समीक्षक सुरेश कुराडे यांनी केले. लेखक आणि समाज, साहित्य आणि समाज यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असून या दोन्ही घटकांचा परिणाम लेखकाच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीवर होत असतो. आणि त्यामुळेच लेखकाकडून निर्माण होणाऱ्या साहित्य कलाकृती मध्ये विविध सामाजिक संदर्भ येत असतात. त्यामुळे साहित्य निर्मितीची प्रक्रिया ही नेहमीच समाजातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय ,आर्थिक व शैक्षणिक घटकांच्यावर अवलंबून असते. अशा प्रकारचे आपले विचार कुराडे सर यांनी अतिशय ओघवत्या भाषा शैलीमध्ये मांडले. साहित्य
या कार्यशाळेचे आयोजन मराठी पदवी विभागाच्यावतीने केले होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. बालाजी वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. या राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक मराठी विभागाचे सहा. प्राध्यापक डॉ. रामदास नाईकनवरे यांनी सूत्रसंचालन केले.
अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य,व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले. तर आभार हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. नागेश चंदनशिवे यांनी मानले.
या ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेसाठी बनारस यूनिवर्सिटी उत्तर प्रदेश मधील प्राध्यापक विलास गपाटे, गुजरात यूनिवर्सिटी मधील प्रा. मालती चौधरी, गोवा युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापक डॉ. संजय रणदिवे, प्राचार्य, डॉ. प्रदीप कांबळे कोल्हापूर, माणदेशातील अनेक साहित्यिक व कवी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राचार्य राजाराम पाटील झरे , डॉ. सुनिता रोकडे विटा, आणि सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार सांगली इत्यादी अनेक मान्यवर या कार्य शाळेमध्ये सहभागी झाले होते.





