Uncategorized

सबलीकरण योजना अनुसूचित जाती प्रमाणे आदिवासी समाजाला सुद्धा लागू करावी

जितेंद्र (आबा) चव्हाण अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र पुरोगामी संघर्ष परिषद यांची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

*धरणगाव:-*(जि.जळगांव) महाराष्ट्र राज्य मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना ही फक्त अनुसूचित जाती साठीच राबवली जात असून आदिवासी समाज हा अनुसूचित जाती पेक्षाही मागास आहे याचा शासनाला विसर पडलेला असून, सदर योजना आदिवासी समाजासाठी ही ताबडतोब लागू करावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने उत्तर महाराष्ट्रातून राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली मंत्रालयावर विराट मोर्चा काढू असा सणसणीत इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जितेंद्र (आबा)चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात चव्हाण पुढे म्हणाले आहेत की,सदर योजनेत चार एकर जिराईत जमीन व दोन एकर बागायती जमीन दिली जाते पन्नास टक्के अनुदान असलेली ही योजना असून पश्चिम महाराष्ट्रातील बाजारभावाचने जमिनींचे दर विचारात घेता शासन एकरी बागायतीसाठी आठ लाख व जिरायती जमिनीसाठी चार लाख देत असून ही रक्कम खूप तोकडी आहे या योजनेतील ही चूक दुरुस्त करून आदिवासी समाजासाठी आदिवासी जिल्ह्यांमध्ये ही योजना ताबडतोब लागू करण्यात यावी असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close